प्रकाश सोळंके यांचा रमेश आडसकर यांना बिनशर्त पाठिंबा,माझ्याएैवजी क्रमांक २८ वर मतदान करा
* प्रकाश भगवान सोळंके यांनी पाठींबा दिल्यावर केले मत व्यक्त
वडवणी | प्रतिनिधी
माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेश बाबुराव कोकाटे (आडसकर) यांना अपक्ष उमेदवार प्रकाश भगवानराव सोळंके यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
माजलगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असलेले प्रकाश भगवानराव सोळंके हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.तरी त्यांचे चिन्ह कॅरम असून मशीन क्रमांक २ वर अ.क्र २१ वर आहे. या निवडणुकीत रमेश बाबूराव आडसकर यांना मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. तरी माझ्यावर प्रेम करणा-या सुज्ञ मतदारांनी माझ्या ऐवजी रमेश बाबूराव आडसकर यांना अ.क्र.२८ वर शेगडी या चिन्हा समोरील बटन दाबून मतदान करावे असे आवाहन केले आहे.त्यांनी हा बिनशर्त आणि सद्सदविवेक बुध्दीने जाहीर पाठिंबा दिला आहे.