- पिंपरखेड येथील प्रा. अमोल निपटे यांना पीएचडी प्रदान
वडवणी प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपरखेड येथील रहिवासी असलेले शेतकरी पुत्र प्रा. अमोल श्रीनिवास निपटे या तरुणाने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर पीएचडी पदवी संपादित केली आहे.
श्री शिवाजी महाराज शिक्षण संस्था अमरावती संचलित, श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी रसायनशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून डाॅ अमोल निपटे कार्यरत आहेत. छत्रपतीसंभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रसायनशास्त्र विषयातील पीएच डी प्रदान करण्यात आली आहे. डाॅ अमोल निपटे यांनी रसायनशास्त्रातील “सिंथेटिक स्टॅटर्जी फॉर द सिंथेसिस ऑफ सम बायोलॉजिकली ॲक्टिव हेट्रोसायक्लिक कंपाउंडस” या विषयावर डॉ सी.एच. गील यांचे मार्गदर्शनात आपले संशोधनकार्य पुर्ण केले. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई वडिलांसह कुटुंबातील ज्येष्ठांना तसेच या विषयातील मार्गदर्शक डॉ. सी. एच. गील, विभाग प्रमुख प्रा. एस. जे. शंकरवार, प्रा. एम. के. लांडे, प्रा. एस. टी. गायकवाड, प्रा. ए. एस. राजभोज, प्रा. बी. बी. शिंगटे, प्रा. बी. आर. साठे, प्रा. जी. एम. बोंदले, प्रा. एस. एस. चव्हाण तसेच मित्रपरीवार, महाविद्यालयाचे प्राचार्य व त्यांचे सहकारी यांना दिले आहे.. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातील नागरिक, शिक्षक व इतर सहकारी प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.