’नवनिर्वाचित नोटरी प्राप्त वकील बांधवांचा वकील संघाकडुन सन्मान
————————————————-
* भारत सरकारकडुन वडवणी न्यायालयातील ९ वकील बांधवांना नोटरी बहाल
————————————————–
वडवणी : प्रतिनिधी
वडवणी शहरातील ९ नामांकित तथा ज्येष्ठ वकील बांधवांची भारत सरकार च्या नोटरी पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे वडवणी वकील संघाच्या वतीने नवनिर्वाचित नोटरी प्राप्त वकील बांधवांचा शाल श्रीफळ देऊन पेढे वाटून सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी वडवणी वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.बी.बी.आंधळे,ॲड.पि.के.तिडके,ॲड.पि.व्ही
तिडके,ॲड.एन.आर.लंगडे,ॲड.पी.एस.उजगरे,वडवणी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.टि.आर.आडे, उपाध्यक्ष ॲड.जे.एस.उजगरे,सचिव ॲड.एस.ए.कदम,सहसचिव ॲड.एस.एल.पवार, कोषाध्यक्ष ॲड.व्हि.यु.रोमण, ग्रंथपाल सचिव,ॲड.आर.बी.उजगरे,ॲड.बी.डी.उजगरे,ॲड.एस.जे.चव्हाण,ॲड.व्हि.बी.लंगे,ॲड.एस.एस.खिरे,ॲड.जि.एस.लंगे,ॲड.पि.के.शिंदे,ॲड.एम.बी.आडे,ॲड.ए.एन.काळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे नोटरीची पदे जाहीर करण्यात आली.यामध्ये वडवणी तालुक्यातील ॲड.बि.के.तिडके,ॲड.टि.ए.शेख,ॲड.एस.ए.लंगे,ॲड.एस.ए.शेख,ॲड.एस.पी.डोंबाळे,ॲड.के.डी.काळे,ॲड.जि.ए.खताळ,ॲड.डि.जे.चव्हाण ॲड.एम.डी.गदळे या ९ नामांकित तथा ज्येष्ठ वकील बांधवांचा समावेश आहे.या सर्वांची मुलाखतीच्या माध्यमातून निवड झाली असून या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून स्वागत होत आहे.