वडवणी कन्या शाळेत महिला मेळावा संपन्न
वडवणी:प्रतिनिधी
वडवणी शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या वडवणी या शाळेत बुधवार रोजी महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी वडवणी शहराच्या नगराध्यक्षा सौ.वंदनाताई शेषेराव जगताप या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच यावेळी असंख्य माता पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वडवणी शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या वडवणी या शाळेत दिनांक २० मार्च २०२४ बुधवार रोजी महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी वडवणी शहराच्या नगराध्यक्षा सौ.वंदनाताई शेषेराव जगताप या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच यावेळी असंख्य माता पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी उपस्थित सर्व मातापालक यांनी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीमती.जोगदंड मॅडम यांनी केले. सुत्रसंचलन श्रीमती.लहाने मॅडम यांनी केले. भोसले मॅडम यांनी मुलींची दैनंदिन उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता व त्यासाठी करत असलेले प्रयत्न सांगितले. तसेच मुख्याध्यापक यांनी आपल्या प्रास्ताविकात मार्च-एप्रिल २०२४ याकालावधीत इयत्ता पहिलीचे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन माता पालक यांना केले. श्रीमती.मुंडे मॅडम यांनी शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानले.