राज्यस्तरीय चाणक्य अबॅकस स्पर्धा परीक्षेत अलोक जेधे याने पटकविला प्रथम क्रमांक, सर्वत्र कौतुक
——————————————————-
नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय विभागीय चाणक्य अबॅकस परीक्षेत माजलगावच्या विद्यार्थ्यांचा डंका
—————————————————-
वडवणी/ प्रतिनिधी-:
नांदेड येथे राज्यस्तरीय विभागीय चाणक्य अबॅकस च्या वतीने विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी नांदेड येथे दहावी विभागीय राज्यस्तरी स्पर्धा घेण्यात आले होते या स्पर्धा परीक्षेत माजलगावच्या चाणक्य अबॅकस चे श्री ओमप्रकाश स्वामी सर व सौ. संगिता स्वामी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले आहे या स्पर्धा परीक्षेत ई ग्रुप मध्ये वय गट ११ ते १४ या गटात अलोक बाबुराव जेधे यांनी अवघ्या सहा मिनिटात जास्तीत जास्त गणित सोडून प्रथम क्रमांक पटकावून प्रथम बक्षीसचा मानकरी ठरला
विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता यश संपादन केलेले विद्यार्थ्यांचा माजलगाव चाणक्य अबॅकसचे श्री ओमप्रकाश स्वामी सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
नांदेड येथे राज्यस्तरीय विभागीय अबॅकस च्या स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत नांदेड विभागीयतील सर्वच चाणक्य अबॅकस च्या सर्व शाखा मधून या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता या स्पर्धा परीक्षेत चा नुसता नुकताच निकाल जाहीर झाला यात ई ग्रुपमधून अलोक बाबुराव जेधे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे या यशामुळे माजलगाव अबॅकस चे मान उंचावली आहे या स्पर्धेत विविध गटातून बरेच विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे त्यामध्ये पुरस्कृत वय गट ११ ते१४ शाशवत गणेश तळेकर ३ रा,वय गट ८ ते१० मध्ये प्राची रामेश्वर निंबाळकर १० वा, वयगट ८ ते १० मध्ये प्रथमेश गजानन सोळके ५ वा या क्रमांकाचे बक्षीस मिळाले तर मास्टर बक्षीस मध्ये स्वरा सतीश बुरंगे,अमीत अविनाश हांडे, गौरव उमेश कोळपकर, राजदीप वैभव सरवदे, विराज श्रीकृष्ण भोसले, जयस नारायण सोळंके, केतन आसाराम तौर या सर्व विद्यार्थ्यांनी मास्टर बक्षीस मिळवले आहे या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
——————————————————–
अबॅकस मुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढते
—————————————————
विद्यार्थ्यांनी अबॅकस ज्ञान घेतल्या वर विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढून स्पर्धा परीक्षा सोपी जाते किती ही अवघड गणित असले तरी काही सेकंदातच गणित सोडविता येते अबॅकस शिक्षणाच्या एकूण आठ लेवल असतात व तीन वेदिक लेवल असतात विद्यार्थ्यांनी या सर्व लेवल पूर्ण केल्यावर कोणतीही कठीण परीक्षा अगदी सोपी जाते त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चाणक्य अबॅकसचे ज्ञान घ्यावे कारण की विद्यार्थ्यांचे गणित एकदम पक्के होते
——-श्री.ओमप्रकाश स्वामी
संचालक चाणक्य अबॅकस माजलगाव