Beed Lokmanch

रामलिंग पतसंस्थेकडून सभासदांना १५ टक्के लाभांशासह किराणा कीटचे वाटप

रामलिंग पतसंस्थेकडून सभासदांना १५ टक्के लाभांशासह किराणा कीटचे वाटप

रामलिंग पतसंस्थेकडून सभासदांना १५ टक्के लाभांशासह किराणा कीटचे वाटप

*सभासदांची दिवाळी गोड झाल्याने आनंदात भर

वडवणी :—

  1. बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात नामांकित असलेल्या वडवणी येथील रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था मर्या.ता.वडवणी यांच्या वतीने दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केल्याप्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिपावली सणाच्या पूर्वी संस्थेच्या सभासदांना १५ टक्के प्रमाणे एकुण १३ लक्ष ५४ हजार ४७४ रुपये लाभांश रक्कमेच्या वाटपाचा तसेच सभासदांसाठीच्या एकुण १० लक्ष रुपये रक्कमेच्या दिपावली फराळ किराणा कीटांचे वाटपाचा शुभारंभ दि.२२ ऑक्टोबर २०२४ मंगळवार रोजी संस्थेचे संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सभासदांना लाभांश व किराणा कीट देत करण्यात आला. तरी ज्या सभासद बांधवांचे लाभांश व किराणा कीट घेवून जाणे बाकी आहे अशांनी पतसंस्थेत येवून आपली लाभांश रक्कम व किराणा कीट हस्तगत करावी असे आवाहन चेअरमन नारायणराव डिगे यांनी केले आहे. दरम्यान रोख लाभांशासह मोठ्या प्रमाणात सणानिमित्त फराळ बनवण्यासाठी साहित्य असलेल्या किराणा कीट मिळाल्याने सर्व सभासदांची यंदाची दिवाळीही आणखीनच गोड झाली असून त्यांच्या आनंदात अधिकची भर पडली आहे.
    संपूर्ण बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नामांकित असलेल्या वडवणी येथील रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था मर्या.ता.वडवणी यांच्या वतीने दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तरतूद व घोषित केल्याप्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश रक्कम व दिवाळी सणासाठी फराळ किराणा कीटचे वाटप करण्याचे सप्टेंबर महिन्यातील वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आले होते. त्याप्रमाणे आता दिपावली सणाच्या पूर्वीच संस्थेच्या सभासदांना १५ टक्के प्रमाणे एकुण १३ लक्ष ५४ हजार ४७४ रुपये लाभांश रक्कमेच्या वाटपाचा तसेच सभासदांसाठीच्या एकुण १० लक्ष रुपये रक्कमेच्या दिपावली फराळ किराणा कीटांचे वाटपाचा शुभारंभ दि.२२ ऑक्टोबर २०२४ मंगळवार रोजी संस्थेचे संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सभासदांना रोख लाभांश व किराणा कीट देत करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन नारायणराव डिगे, व्हाईस चेअरमन सुरेशराव ढवळशंक, व्यवस्थापक दिगांबरजी गुरसाळी, माजी चेअरमन कचरुशेठ झाडे, माजी व्हाईस चेअरमन सर्जेराव महाराज आळणे, सर्वश्री संचालक नवनाथराव म्हेत्रे, अरुणराव गुरसाळी, प्रकाशराव डिगे, उपमन्यूजी वारे, सुभाषराव वाव्हळ, बाबासाहेब मस्के, श्रीमती.सिताबाई रामभाऊ डिगे, सौ.रंजनाताई शिवाजीराव टकले, सौ.शैलजाताई अर्जुनराव भंडारे यांच्यासह सभासद बांधव कोष्टी समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली रोकडे, गुरुप्रसाद गुरसाळी, दत्तात्रय वीर, शिवाजीराव टकले, अर्जुनराव भंडारे, वैजिनाथ डिगे, बाबुराव खाटोकर, सुदामराव गलांडे,किसनराव फासे, आश्रुबा मुंडे, कैलास भुजबळ, दत्तात्रय पारखे, लक्ष्मणराव भंडारे, गणेशराव डिगे, वल्लभप्रसाद गुरसाळी, विश्वनाथ दिवटे, अनिल आलगट, दिलीप शिंदे, सुभाष टिकुळे, रामेश्वर रेडेकर, विठ्ठल वरवडे, संजय खटावकर, राम बाबर, दगडू गुरसाळी, नारायण टिपरे यांसह पतसंस्थेचे कर्मचारी सचिन म्हेत्रे, सोमेश्वर मस्के, ईश्वर ढवळशंक, राहूल बागडे, अविनाश वाव्हळ, लखन टिकुळे, अल्पबचत ठेव प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरसाळी, ज्ञानेश्वर डिगे, अजय भैरट, विजय हेंद्रे, केशव टकले, डिगांबर झाडे, शिवाजी लोकरे व इतर सभासद व ग्राहक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. रामलिंग पतसंस्थेच्या वतीने या दिवाळीमध्येही सर्व सभासदांना लाभांश रक्कम तसेच फराळ किराणा कीटांचे वाटपही होत असल्याने सर्व सभासदांची दिवाळी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही गोड होत आहे. तरी ज्या सभासद बांधवांचे लाभांश व किराणा कीट घेवून जाणे बाकी आहे, अशांनी पतसंस्थेत येवून आपली लाभांश रक्कम व किराणा कीट हस्तगत करावी असे आवाहन चेअरमन नारायणराव डिगे यांनी केले आहे. दरम्यान रोख लाभांशासह मोठ्या प्रमाणात दिवाळी फराळ बनवण्यासाठी उपयुक्त साहित्य असलेल्या किराणा कीट मिळाल्याने सर्व सभासदांची यंदाचीही दिवाळी आणखीनच गोड झाली असून त्यांच्या आनंदात अधिकची भर पडली आहे. रामलिंग पतसंस्थेच्या या दायित्व व सहकार्याबध्दल सभासद बांधवांनी पतसंस्थेच्या संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन करुन आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!